एका वेश्येची प्रेमकथा: लव्ह ऍट बुधवार पेठ

Daily Marathi News: युवा लेखक नितीन थोरात यांची "लव्ह ऍट बुधवार पेठ" ही पंधरावी कादंबरी लवकरच स्टोरीटेलवर येत आहे.

नितीन थोरात यांनी स्वतः त्यांच्या फेसबुक पेज वर याविषयी माहिती दिली आहे.

"लेखकानं बेधुंद उधळावं. अगदी वारूसारखं. कधी सामाजिक लिहावं कधी भावनिक लिहावं, हिंसकही लिहावं, प्रेमळंही लिहावं. लेखकानं नदीसारखं बेछुट वाहावं. प्रेमकथा लिहाव्या, भयकथा लिहाव्या. शृंगारही थेट मांडावा आणि विद्रोहही ताकदीनं रेखाटावा. ऐतिहासिकही लिहावं आणि देवाधर्माचंही लिहावं. अशाच बेंधुद लिखाणातून तयार झालेली ही पंधरावी कादंबरी 'लव्ह ऍट बुधवार पेठ' स्टोरीटेलवर अ‍ॅपवर लवकरच उपलब्ध होत आहे."

लव्ह ऍट बुधवार पेठ
 लव्ह ऍट बुधवार पेठ - नितीन थोरात 

ही आहे एका वेश्येची प्रेमकथा. ही आहे गावाकडच्या एका साध्याभोळ्या पोराची निर्मळ गाथा. ही आहे वासनेच्या पल्याड पोहचलेली एक नितळसुंदर त्यागकथा. 

"येत्या सहा फेब्रुवारीपासून ही कादंबरी जगभर उपलब्ध असेल. ऑडिओबुक असल्याने केवळ स्टोरीटेलवरच उपलब्ध. बाकी तुमचं प्रेम आणि आशीर्वाद याची भरभरुन कमाई आहेच." - नितीन थोरात 

नितीन थोरात यांची एक विशिष्ट शैली आहे लिहिण्याची, जी वाचकांना भावते आणि आवडते.

News about "Love At Budhwar Peth" by Nitin Thorat

- Daily Marathi News ( www.DailyMarathiNews.in )

तुम्हाला हे ही वाचायला आवडेल - Budhwar Peth History in Marathi - पुण्याची बुधवार पेठ - संध्याकाळ झाली की इथल्या मुली...

थोडे नवीन जरा जुने

संपर्क फॉर्म