पिंपरी (Pimpri) : अखेर भोसरीतील कृत्रिम धावमार्ग खेळाडूंसाठी खुला

अनेक वर्षांपासून धावमार्गावर खेळाडूंचा नियमित सराव आणि विविध स्पर्धांमुळे, तसेच बाहेरील वातावरणामुळे जुना धावमार्ग खराब झाला होता. वर्षभरापूर्वी जुना धावमार्ग बदलण्याचे काम हाती घेण्यात आले होते.

पिंपरी (Pimpri) : अखेर भोसरीतील कृत्रिम धावमार्ग खेळाडूंसाठी खुला


पिंपरी (Pimpri): महापालिकेच्या भोसरी-इंद्रायणीनगर येथील संत ज्ञानेश्वरमहाराज क्रीडा संकुलातील कृत्रिम धावमार्गाचे (सिंथेटिक ट्रॅक) काम पूर्ण झाले आहे. वर्षभरानंतर खेळाडूंसाठी शुक्रवारी कृत्रिम धावमार्ग खुला करण्यात आला आहे.

पिंपरी-चिंचवड(Pimpri Chinchwad) शहरातील ॲथलेटिक्सचा सराव करणाऱ्या खेळाडूंना सरावासाठी इंद्रायणीनगरमधील एकमेव मैदान आहे. या ठिकाणी चारशे मीटरचा आठ लेनचा कृत्रिम धावमार्ग आहे. अनेक वर्षांपासून धावमार्गावर खेळाडूंचा नियमित सराव आणि विविध स्पर्धांमुळे, तसेच बाहेरील वातावरणामुळे जुना धावमार्ग खराब झाला होता. वर्षभरापूर्वी जुना धावमार्ग बदलण्याचे काम हाती घेण्यात आले होते. त्यासाठी चार कोटींचा खर्च करण्यात आला आहे.

क्रीडा संकुलातील धावमार्गावर सकाळी आणि सायंकाळी या दोन सत्रांत खेळाडू मैदानी स्पर्धेचा सराव करत होते. खेळाडूंना सरावासाठी धावमार्ग उपलब्ध नसल्याने त्यांना इतर ठिकाणी सराव करावा लागत होता. धावमार्गावर सराव करता न आल्याने त्याचा थेट परिणाम खेळाडूंच्या कामगिरीवर होत होता. अखेरीस वर्षभराने धावमार्ग खुला केल्याने खेळाडूंनी समाधान व्यक्त केले.

- News by DailyMarathiNews

थोडे नवीन जरा जुने

संपर्क फॉर्म