Pune: पुण्यातील संशोधक डॉ. तुषार निकाळजे यांचे पुस्तक सोलापूर विद्यापीठाततील अभ्यासक्रमात संदर्भ पुस्तक...

डॉ. तुषार निकाळजे (Dr. Tushar Nikalje) या पुण्यातील संशोधकाचे "भारतीय निवडणूक प्रणाली" हे पुस्तक सोलापूर विद्यापीठाने एम. ए. (राज्यशास्त्र) विषयास संदर्भ पुस्तक म्हणून मान्यता दिली आहे. 

डॉ. तुषार निकाळजे (Dr. Tushar Nikalje)

डॉ. निकाळजे यांची निवडणूक विषयावरील दोन पुस्तके महाराष्ट्रातील सात विद्यापीठे व चार स्वायत्त महाविद्यालये यांच्या अभ्यासक्रमास संदर्भ पुस्तक म्हणून मान्यता प्राप्त आहे. 

डॉ. निकाळजे यांनी आजपर्यंत १४ पुस्तके लिहिली आहेत. त्याचबरोबर निवडणूक, सामान्य प्रशासन, विद्यापीठ प्रशासन, नागरी सेवा इत्यादी विषयांवर वर्तमानपत्रे, साप्ताहिके, मासिके यामध्ये ७८ लेख प्रकाशित केले आहेत. राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील चार कॉन्फरन्स मध्ये शोधनिबंध सादर केले आहेत. डॉ. निकाळजे यांनी दृष्टिहीन व्यक्तींकरिता "अंडरस्टँडिंग द युनिव्हर्सिटी" ( Understanding the University ) या इंग्रजी ब्रेल पुस्तकाचे लेखन व प्रकाशन केले आहे. डॉ. निकाळजे यांच्या नावाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, ब्रावो इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड, वर्ल्ड रेकॉर्ड युनिव्हर्सिटी, लंडन यामध्ये झाली आहे. वर्ष २०२३ मध्ये गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये त्यांच्या नावाची नोंद झाली आहे. याचबरोबर त्यांनी "क्लर्क टू वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर" ( Clerk to World Record Holder ) या डॉक्युमेंटरी फिल्मची निर्मिती देखील केली आहे. हा सर्व शैक्षणिक व संशोधनात्मक प्रवास डॉ. निकाळजे यांनी स्वखर्चाने केला आहे .

डॉ. तुषार निकाळजे (Dr. Tushar Nikalje) हे एका विद्यापीठात शासकीय पदावर शिक्षकेतर- कर्मचारी म्हणून ३२ वर्षे कार्यरत होते. ते दोन वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाले आहेत. परंतु आजही वयाच्या ६० व्या वर्षी ते आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रकल्प करण्यात व्यस्त आहेत. याचबरोबर काही शैक्षणिक व अशासकीय संस्थांमध्ये प्रोत्साहन पर लेक्चर देण्याचे कार्य करीत आहेत. ही सेवा ते कोणतेही मानधन अथवा शुल्क न घेता केवळ सामाजिक जबाबदारी म्हणून करीत आहेत. 

कोणत्याही प्रसिद्धीच्या झोतात नसलेले परंतु देशाच्या प्रगतीमध्ये सहभागी असलेल्या अशा पडद्यामागच्या कलाकारांचे कार्य इतरांना प्रोत्साहन देणारे आहे.

- News published by DailyMarathiNews

थोडे नवीन जरा जुने

संपर्क फॉर्म