समय सूचकता म्हणजे वेळेनुसार रंग बदलणे...

लेख - समय सूचकता म्हणजे वेळेनुसार रंग बदलणे... - डॉ. तुषार निकाळजे

लेख - समय सूचकता म्हणजे वेळेनुसार रंग बदलणे... - डॉ. तुषार निकाळजे


योग्य वेळी योग्य कृती करणे म्हणजे समसूचकता

मोठमोठे तज्ञ कायमच सांगत असतात,"रोजच्या जीवनात समय सूचकता असणे महत्त्वाचे आहे. योग्य वेळी योग्य कृती करणे म्हणजे समसूचकता". असे सांगितलं जाते. यश अपयश यांच्या सूत्रामध्ये समय सूचकतेला अत्यंत महत्त्व आहे. आपण रोजच घरातील कामे करीत असतो. परंतु या कामांचे बारकाईने निरीक्षण केल्यास कधी कधी यामध्ये तफावत किंवा बदल जाणवतो.म्हणजे परवा केलेले पहिले काम, दुसरे काम, तिसरे काम याचा अनुक्रम आपल्या घरगुती अडचणीनुसार वेगवेगळा वेळी करीत असतो. हा एक समय सूचकतेचा भाग आहे. 

खेळांमध्ये समय सुचतेचा वेगवेगळ्या प्रकारे वापर केला जातो

खेळामध्ये देखील याचे महत्त्व सांभाळले जाते. क्रिकेट सारख्या खेळामध्ये गोलंदाजाने टाकलेल्या चेंडूवर कशाप्रकारे फटका मारावा किंवा डिफेन्स करावा, हे ते बॅट्समन ठरवतो. त्या बॅट्समनला कोणत्या प्रकारचे चेंडू टाकावेत हे ते गोलंदाज ठरवतात. राउंड द विकेट बाउन्सर स्लोबल, असे वेगवेगळे प्रकार असतात, हे आपणास माहीतच आहे . यष्टिररक्षकासारखी समय सूचकता महत्त्वाचे योगदान ठरते. कबड्डी सारख्या खेळामध्ये एखाद्या गटातील जास्त खेळाडू बाद झाले असतील आणि दुसऱ्या गटातील जास्त खेळाडू शिल्लक असतील, तर कमी खेळाडू असलेल्या संघातील एखादा खेळाडू फक्त एन्ट्री करूनच गुण मिळवण्याच्या प्रयत्नात असतात. इतर बऱ्याच खेळांमध्ये समय सुचतेचा वेगवेगळ्या प्रकारे वापर केला जातो. 

प्राण्यांना समय सुचकतेनुसार रंग बदलण्याची देणगी

निसर्गाने काही प्राण्यांना समय सुचकतेनुसार रंग बदलण्याची देणगी दिली आहे. काही प्राण्यांची कातडी निसर्गत: जाड असते. यांना उपद्रव होऊ नये म्हणून निसर्गाने केलेली ही उपायोजना आहे.

व्यवस्थेतील समय सूचकता


परंतु व्यवस्थेतील समय सूचकता वेगळ्याच प्रकारची असते. एखाद्या व्यक्तीने व्यवस्थेतील त्रुटींविरोधात उपोषणाचे निवेदन दिल्यास त्यावर उपाययोजना केली जाते. म्हणजे तो नागरिक उपोषणास बसू नये व त्यामुळे व्यवस्थेचे पितळ उघडे पडू नये, हा त्यामागचा उद्देश असावा. काही वेळा प्रसार माध्यमात बातम्या येतात, नंतर व्यवस्था जागी होते, ही वेगळी समय सुचकता. 

चित्रपट आणि समय सुचकता

येथे एका चित्रपटाच्या प्रदर्शित होण्याचा प्रकार सांगावासा वाटतो. ३५ वर्षापूर्वी एका दिग्गज मराठी विनोदी अभिनेत्याचा व दिग्दर्शकाचा चित्रपट प्रदर्शित होणार होता. त्याचवेळी एका इंग्रजी चित्रपटाचे देखील वेगवेगळ्या चित्रपट गृहांमध्ये प्रदर्शित होण्याच्या प्रतीक्षेत होते. परंतु इंग्रजी चित्रपटाच्या दिग्दर्शकांने व निर्मात्याने त्यांच्या इंग्रजी चित्रपटाचे प्रदर्शित होण्याची वेळ बदलली.त्यांनी त्यांचा चित्रपट तब्बल तीन ते चार महिन्यानंतर चित्रपट गृहांमध्ये प्रदर्शित केला होता. ही एक वेगळी समय सुचकता. 

समय सुचकता - माहिती अधिकार कायद्याचे उदाहरण

वर्ष २००५ नंतर अस्तित्वात आलेल्या माहिती अधिकार कायद्याचे उदाहरण वेगळेच आहे. माहिती अधिकारामध्ये एखाद्या नागरिकाने माहिती विचारल्यास व्यवस्था खडबडून जागी होते व त्यामध्ये उपाययोजना व दुरुस्त्या केल्या जातात. ही प्रक्रिया ३० दिवसांमध्ये घडते व नंतर माहिती अधिकारामध्ये त्याचे उत्तर दिले जाते. 

येथे एका विद्यापीठाच्या कार्यशाळा संदर्भातील प्रकरणाचा उल्लेख करावासा वाटतो एका नागरिकाने एका विद्यापीठाच्या वर्ष १९९५ ते २००६ या कालावधीमध्ये झालेल्या प्रशासकीय कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या कार्यशाळेच्या खर्चाची माहिती विचारली होती. तदनंतर माहिती अधिकाराचा अर्ज दाखल झाल्यापासून १७ व्या दिवशी कार्यशाळा घेण्यात आली. परंतु त्यापूर्वी १५ वर्षे कार्यशाळा झाली नसल्याचे उघडकीस आले होते . "जो होता है वह अच्छेके लिये होता है",असे समजण्यास हरकत नाही. अशा प्रकारे आपले पितळ उघडे झाले असल्यास त्यावर झाकण घालण्यासाठी व्यवस्थेतील तज्ञ मंडळी योग्य समय सुचकतेचा वापर करताना दिसतात.
थोडे नवीन जरा जुने

संपर्क फॉर्म