मोदी सरकारचा सर्वसामान्यांना दिलासा, पेट्रोल-डिझेल झालं स्वस्त

 Petrol price Diesesl price : मोदी सरकारनं पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात (Petrol price Diesesl price) करण्याचा निर्णय घेतला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी 2 रुपयांची घसरण झाली आहे.

Petrol price Diesesl price - India

निवडणुका जाहीर हाेण्यापूर्वी पेट्रोल-डिझेल 2 रु.स्वस्त:गॅसच्या दरकपातीनंतर आठच दिवसांत दुसरा निर्णय

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता एक-दोन दिवसांत लागण्याची शक्यता असताना मोदी सरकारने पेट्रोल व डिझेलचे दर प्रत्येकी २ रुपयांनी स्वस्त करून सर्वांना दिलासा दिला आहे. 

शुक्रवारी सकाळपासूनच (१५ मार्च) नवे दर लागू होतील. 

८ मार्च रोजी घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात १०० रुपये कपात करण्यात आली होती.

२३ महिन्यांनतर आता पुन्हा हे इंधन स्वस्त झाले आहे

केंद्रीय मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी सोशल मीडियावरून गुरुवारी रात्री हा निर्णय जाहीर केला. नव्या दरांनुसार, मुंबईत पेट्रोलचे दर १०६.३१ रुपयांवरून १०४.२० रुपयांपर्यंत कमी होतील, तर डिझेलचे दर ९४.२७ रुपयांवरून ९२.१५ रुपये प्रतिलिटर कमी होतील. 

यापूर्वी केंद्र सरकारने एप्रिल २०२२ मध्ये पेट्रोलवरील एक्साईज ड्युटी ८ रुपयांनी तर डिझेलवरील कर ६ रुपयांनी कमी केला होता. २३ महिन्यांनतर आता पुन्हा हे इंधन स्वस्त झाले आहे.

कोणत्या शहरात पेट्रोलचे किती दर?

शहर           जुने दर         नवीन दर

मुंबई -        106.31          104.2

कोलकाता -  106.3           103.94

चेन्नई -         102.63          100.75          

नवी दिल्ली -  96.72           94.72


कोणत्या शहरात डिझेलचे किती दर?

शहर            जुने दर         नवीन दर

मुंबई -            94.27         92.15 

कोलकाता -     92.76         90.76 

चेन्नई -            94.24         92.34

नवी दिल्ली -   89.62          83.62       

- News by DailyMarathiNews

थोडे नवीन जरा जुने

संपर्क फॉर्म