Budhwar Peth History in Marathi - पुण्याची बुधवार पेठ - संध्याकाळ झाली की इथल्या मुली...

बुधवार पेठ ( Budhwar Peth ) म्हणलं की वेश्याव्यवसाय इतकंच लोकांना कळत, परंतु या पलीकडेदेखील बुधवारपेठेची ओळख आणि इतिहास आहे ( the history of prostitution in Budhwar Peth ).

Budhwar Peth History in Marathi - पुण्याची बुधवार पेठ


पुण्यातील पुस्तकांच्या दुकानांची बाजारपेठ असलेला अप्पा बळवंत चौक म्हणजेच ABC चौक इथेच आहे. जिथे अगदी सर्व प्रकारची पुस्तके परवडणाऱ्या दरात उपलब्ध आहेत. तसेच या भागात अनेक पुरातन मंदिरे आहेत. पुण्याची ग्रामदेवता ‘तांबडी जोगेश्वरी’ हिचे मंदिर आणि प्रसिद्ध श्रींमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे मंदिरसुद्धा याच भागात आहे.

पुण्यातील बुधवार पेठ हा आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा रेड लाईट एरिया आहे. याची सुरवात काहीशी अशी स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांनी केली होती. त्यावेळी ब्रिटिशांनी आपल्या सै-निकांची श’रीर सुखाची गरज भागविण्यासाठी कम्फर्ट झोन म्हणुन रेडलाईट एरियांची निर्मिती केली. ब्रिटिश व्यापाऱ्यांच्या सोयीसाठी कुंटणखाने निर्माण केले. पुण्यात १९४१ साली मार्गोचा अड्डा हा कुंटणखाना प्रसिद्ध झाला. पुण्यातील बुधवार पेठ हा देशातील प्रसिद्ध रेडलाईट एरिया असुन नेपाळी मुली मोठ्या संख्येने या व्यवसायात दिसुन येतात.

बुधवार पेठ ( Budhwar Peth ) - या भागाचे विशेष हे आहेे की, बुधवार पेठमध्ये दिवसभर पुस्तके खरेदी करणाऱ्यांची प्रचंड गर्दी असते, दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी रांगा लागतात तर कुणी इलेक्ट्रॉनिक शॉपिंग साठी गर्दी करतात पण जसजशी संध्याकाळ होऊ लागते तसतशी बुधवार पेठेचे रस्ते वेश्याबाजाराने गजबजुन जातात. संध्याकाळ झाली की इथल्या मुली ज्यांना वेश्या म्हणून ओळखले जाते. या भरपूर मेकअप व पुरुषांना आकर्षित करणारी कपडे घालुन रस्त्यावर, गल्लीत, दारात, गॅलरीतुन मादक इशारे करतात.

सर्वांत जास्त लोकसंख्या असलेली, बुधवार पेठ मूळतः सम्राट औरंगजेबाने 1703 मध्ये मुहियाबाद म्हणून स्थायिक केली होती. निजामाच्या हल्ल्यात 60 टक्के घरे उद्ध्वस्त झाल्यानंतर मध्यवर्ती असलेल्या या पेठची पुनर्बांधणी माधवराव पेशव्यांनी केली आणि गोविंद सदाशिव खाजगीवाले यांची प्रभारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. 

याच भागात नाना फडणीस आणि मोरोबादादा फडणीस यांसारख्या अनेक प्रतिष्ठित व्यक्तींची निवासस्थाने होती, त्यात १८०३ मध्ये बांधलेल्या बाजीराव II च्या तीन मजली "बुधवार वाड्याचा" ( Budhwar Wada ) समावेश होता. यात जोगेश्वरी, बेलबाग विष्णू, तुळशीबाग राम यांची मंदिरे होती आणि "हुजूरपागा" येथे पेशव्यांच्या घोडदळाचे निवासस्थान होते.

तुम्हाला हे ही वाचायला आवडेल - एका वेश्येची प्रेमकथा: लव्ह ऍट बुधवार पेठ

थोडे नवीन जरा जुने

संपर्क फॉर्म