भारत फोर्जच्या उपाध्यक्षपदी अमित कल्याणींची पुनर्नियुक्ती

कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक बाबा कल्याणी यांचे अमित हे पुत्र आहेत. अमित कल्याणी यांची नियुक्ती १ मे २०२४ ते १० मे २०२९ या कालावधीसाठी असेल.

Re-appointment of Amit Kalyani as Vice-Chairman of Bharat Forge


पुणे (DailyMarathiNews): भारत फोर्ज कंपनीचे आजीव संचालक अमित कल्याणी (Amit Kalyani) यांची कंपनीचे उपाध्यक्ष व सहव्यवस्थापकीय संचालक म्हणून पुढील पाच वर्षांसाठी पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे.

कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक बाबा कल्याणी यांचे अमित हे पुत्र आहेत. अमित कल्याणी (Amit Kalyani)  यांची नियुक्ती १ मे २०२४ ते १० मे २०२९ या कालावधीसाठी असेल. कंपनीच्या संचालक मंडळाने ३ एप्रिलला झालेल्या बैठकीत या नियुक्तीला मंजुरी दिली. अमित कल्याणी हे १९९९ पासून कंपनी कार्यरत आहेत. त्यांची २०१९ मध्ये उपव्यवस्थापकीय संचालक आणि नंतर २०२३ मध्ये सहव्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली.

त्यांचा सध्याचा सहव्यवस्थापकीय संचालकपदाचा कार्यकाळ १० मे रोजी संपुष्टात येत आहे. त्यांची पुनर्नियुक्ती भागधारकांच्या मंजुरीवर अवलंबून असणार आहे. या पुनर्नियुक्तीबाबत भारत फोर्जने भांडवली बाजाराला माहिती दिली आहे.

News: Re-appointment of Amit Kalyani as Vice-Chairman of Bharat Forge

थोडे नवीन जरा जुने

संपर्क फॉर्म