सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांचे मतदारांना मराठीतून आवाहन; म्हणाले, "या खेपेला…

संविधानाने आपल्याला अनेक हक्क दिले आहेत. त्यापैकी मतदान करणे हा आपला महत्त्वाचा अधिकार आहे, तसेच ते आपले कर्तव्यही आहे, असे सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड म्हणाले.

भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी मतदारांना मराठीतून आवाहन केले.


डेली मराठी न्यूज ( Daily Marathi News ): लोकसभा निवडणुकीचा हंगाम सुरू आहे. आज (दि. २६ एप्रिल) लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा दुसरा टप्पा पार पडत आहे. एकूण सात टप्प्यात निवडणूक होत आहे. मतदानाचा टक्का वाढवा, यासाठी सर्वच यंत्रणा प्रयत्न करत असतात. राजकारण्यांपासून ते सेलिब्रिटी, खेळाडू, महत्त्वाचे व्यक्ती मतदान जास्तीत जास्त होण्यासाठी आवाहन करत असतात. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनीही यंदा लोकसभा निवडणुकीत सर्वांनी मतदान करावे, यासाठी आवाहन केले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे सरन्यायाधीशांनी हे आवाहन मराठीत केले आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या एक्स ( X / Twitter ) अकाऊंटवर त्यांचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

भारताचे सरन्यायाधीश डॉ. डी. वाय. चंद्रचूड यांनी मतदारांसाठी मराठीत खास संदेश दिला आहे. 

आपली ताकद ओळखून सर्वांनी मतदान करूया. संपूर्ण विश्वात भारत देशाला महान बनवूया, असे ते म्हणाले. याआधी त्यांनी इंग्रजीतही मतदानासाठी आवाहन केले होते. त्यानंतर त्यांचा हा मराठीतील संदेश समोर आला आहे.

थोडे नवीन जरा जुने

संपर्क फॉर्म