मुख्यमंत्री म्हणाले, ‘पुणेकर हवा काढतात…’

पुणेकर हुशार आहेत, एखाद्याच्या घरासमोरची गाडी काढायची असेल तर गाडीची हवा काढतात. विरोधकांचीही हवा काढून नक्कीच हवा काढणार आहेत, असे भाष्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ‘पुणेकर हवा काढतात…’


पुणे ( DailyMarathiNews ): पुणेकर हुशार आहेत, एखाद्याच्या घरासमोरची गाडी काढायची असेल तर गाडीची हवा काढतात. विरोधकांचीही हवा काढून नक्कीच हवा काढणार आहेत, असे भाष्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा पुण्यातील रेसकोर्स मैदानावर सुरू होती. त्यावेळी शिंदे बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, पुण्याचे उमेदवार मुरलीधर मोहोळ, बारामतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार, मावळचे उमेदवार श्रीरंग बारणे, शिरूरचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील या वेळी उपस्थित होते.

महाराष्ट्र मोदींवर प्रेम करतो

शिंदे म्हणाले, की महाराष्ट्रातल्या सभा रेकॉर्डब्रेक होत आहेत. महाराष्ट्र मोदींवर प्रेम करतो. राम मंदिर स्वप्नवत वाटत होते, पण राम मंदिर उभे राहिले. काश्मीरला देशाला जोडले. काँग्रेसने साठ वर्षांत देश बुडवला. मोदींनी पाण्याखाली देशासाठीच प्रार्थना केली. ही लढाई महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी नाही. तर देशाचा सन्मान वाढवणारे मोदी विरुद्ध देशाची नाचक्की करणारे राहुल गांधी अशी लढाई आहे.

थोडे नवीन जरा जुने

संपर्क फॉर्म