'जय भवानी' आणि 'हिंदू' बाबत फेरविचार करा; ठाकरे गटाची निवडणूक आयोगास विनंती

मुंबई ( DailyMarathiNews ) - शिवसेना ठाकरे गटाच्या प्रचार गीतामधील काही शब्दांवर आयोगाच्या राज्यस्तरीय माध्यम प्रमाणीकरण समितीने घेतलेले आक्षेप हे आयोगाच्या नियमानुसारच आहेत. मात्र या दोन्ही शब्दांबाबत फेरविचार करण्याची विनंती ठाकरे गटाने कालच केली असून त्याबाबत मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकिलगम यांच्या अध्यक्षतेखालील अपिलीय समिती निर्णय घेईल.

( संग्रहित छायाचित्र ) - DailyMarathiNews


प्रचार गीतामधील जय भवानी आण हिंदू शब्दावर निवडणूक आयोगाने घेतलेले आक्षेप हे नियमानुसार घेण्यात आले आहेत. परंतु  ठाकरे गटाने केलेल्या फेरविचार अर्जावर आयोग लवकरच निर्णय घेईल अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकिलगम यांनी बुधवारी दिली.

आतापर्यंत अशा प्रकारच्या ३९ प्रकरणांत आयोगाने आक्षेप घेतल्याची माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी यांनी दिली.

शुक्रवारी २६ एप्रिल रोजी मतदान

मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यातील विदर्भ व मराठवाडयातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी या आठ लोकसभा मतदारसंघांतील प्रचार आज संपला असून तेथे शुक्रवारी २६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. यासाठी एकूण १६ हजार ५८९ मतदान केंद्रांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून या निवडणुकीत एक कोटी ४९ लाख २५ हजार मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या टप्प्यात २०४ उमेदवार रिंगणात आहेत. सर्वाधिक ३७ उमेदवार अमरावती, परभणी (३४) आणि हिंगोलीत ३३ उमेदवार रिंगणात आहेत.


थोडे नवीन जरा जुने

संपर्क फॉर्म