पारोळा ( DailyMarathiNews ): राणी लक्ष्मीबाई ज्युनियर कॉलेज, पारोळा येथील प्रा. नरेश पवार सर यांना दि. 7 मे 2024 रोजी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथील आदरणीय कुलगुरू महोदय डॉ. व्ही.एल. माहेश्वरी व त्यांचे मार्गदर्शक प्रा.डॉ.सुरेश नारायण नंदन, माजी प्राचार्य डॉ. प.रा घोगरे विज्ञान महाविद्यालय, धुळे यांच्या हस्ते पीएचडी / Ph.D. / विद्यावाचस्पती ( वनस्पतीशास्त्र ) पदवी प्रदान करण्यात आली.
![]() |
पारोळा येथील प्रा.नरेश पवार यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे पीएचडी पदवी प्रदान |
डॉ. नरेश एन पवार यांनी आतापर्यंत आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर 6 शोध निबंध सादर केले आहेत.
प्रा. नरेश पवार यांचे शैक्षणिक तसेच सर्व क्षेत्रातील कर्मचारी, मित्र परिवार यांच्याकडून अभिनंदन व कौतुक होत आहे.
News published by - DailyMarathiNews
Parola News, Daily Marathi News