Abhijit Bichukale - अभिजीत बिचुकले ‘या’ बड्या नेत्याला देणार टक्कर; ‘या’ मतदार संघातून भरला अर्ज

मुंबई ( DailyMarathiNews ):लोकसभा निवडणुकीचे दोन टप्पे पार पडले आहेत. अशातच आता तिसऱ्या टप्प्याचे मतदान 7 मे ला होणार आहे. या निडवणुकीच्या रिंगणात अनेक दिग्गज नेते उतरले आहेत. अशातच आता नेहमीच वादग्रस्त वक्तव्यासाठी चर्चेत असणारे बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले(Abhijit Bichukale) हे देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले ( Abhijit Bichukale )


Abhijit Bichukale - पुढील 13 दिवस अभिजीत बिचुकले कल्याणमध्ये ठाण मांडून बसणार

अभिजीत बिचुकले यांनी सातारा मतदारसंघापाठोपाठ कल्याण मतदारसंघात देखील लोकसभा निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या मतदार संघात शिंदे गटाचे विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे आणि ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर यांच्यामध्ये मुख्य लढत होणार आहे. अशातच आता त्यांच्या राजकीय फोडणीला तेलाची धार द्यायला मी आलो असल्याचं सांगून अभिजित बिचुकले यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

अभिजित बिचकुले यांनी सांगितले की, साताऱ्यातील मतदान झाल्यावर पुढचे 13 दिवस मी कल्याण मतदारसंघात ठाण मांडून बसणार आहे. यापूर्वी अभिजीत बिचुकले यांनी या आधी सातारा लोकसभा मतदार संघातून उमेदवारी अर्ज भरला आहे. साताऱ्यात भाजपकडून उदयनराजे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून शशिकांत शिंदे हे मुख्य निवडणूक लढवत आहेत.

कल्याणचा विकास आतापर्यतं कुणीही केलेला नाही, इथे फक्त राजकारणच झालं - अभिजीत बिचुकले

अशातच साताऱ्यानंतर अभिजीत बिचुकले यांनी (Abhijit Bichukale) आता कल्याणमध्ये देखील अर्ज भरल्याने त्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. कल्याण लोकसभेच मतदान हे 20 मे रोजी पार पडणार आहे. या मतदार संघात शिवसेनेच्या दोन्ही गटात जोरदार लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशातच अभिजित बिचकुलेनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर एक आरोपही केला आहे. कल्याणचा विकास आतापर्यतं कुणीही केलेला नाही, इथे फक्त राजकारणच झालं असल्याचा आरोप करत अभिजीत बिचुकले यांनी केला आहे.

वेगवेगळ्या स्टंट आणि वक्तव्याने अभिजित बिचकुले ( Abhijit Bichukale ) कायम चर्चेत

अभिजित बिचकुलेनि कल्याण लोकसभेच्या रिंगणात उडी घेतल्याने ते अर्ज भरल्यापासून पुढील 13 दिवस आता ते कल्याणमध्ये ठाण मांडून बसणार असल्याचं देखील म्हणाल जात आहे. बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांनी आतापर्यन्त अनेक निवडणुका लढवल्या आहेत. आपल्या वेगवेगळ्या स्टंट आणि वक्तव्याने ते कायम चर्चेत राहिले आहेत.

"मुख्यमंत्री मीच ठरवणार" - अभिजित बिचकुले

बिचकुलेंनी साताऱ्यातून उदयनराजे भोसले यांना देखील निवडणुकीच्या माध्यमातून अनेकदा खुलं आव्हान दिलं आहे. बिचकुलेंनी अनेक निवडणुका लढवल्या असल्या तरी अद्याप त्यांना यश आलेलं नाही. ‘2019 चा मुख्यमंत्री मीच ठरवणार’, असं बेधडक वक्तव्य बिचकुलेंनी केलं होतं. गेल्या लोकसभा निवडणुकीत बिचुकले यांनी अपक्ष अर्ज देखील दाखल करत अनामत रक्कम म्हणून 12 हजार 500 रुपयांची चिल्लर त्यांनी जमा केली होती.

थोडे नवीन जरा जुने

संपर्क फॉर्म