उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला अजित पवारांसारखा भ्रष्टाचार करायला खातं (मंत्रीपद) दिलं नव्हतं, असं वक्तव्य जळगावचे माजी खासदार उन्मेश पाटील ( Unmesh Patil ) यांनी केलं आहे.
![]() |
चाळीसगाव मशाल रॅली - उन्मेश पाटलांकडून जळगावात करण पवार यांचा प्रचार |
चाळीसगाव ( DailyMarathiNews ): महायुतीचे जळगाव लोकसभेचे उमेदवार करण पाटील (शिवसेना ठाकरे गट) यांच्या प्रचारार्थ उन्मेश पाटील यांनी चाळीसगाव ( Chalisgaon ) येथे मशाल रॅलीचं आयोजन केलं होतं. या रॅलीदरम्यान त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी पाटील म्हणाले, आमच्या या मशाल रॅलीच्या माध्यमातून खानदेशात आता क्रांती सुरू झाली आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला अजित पवारांसारखा भ्रष्टाचार करायला खातं (मंत्रीपद) दिलं नव्हतं, असं वक्तव्य जळगावचे माजी खासदार उन्मेश पाटील यांनी केलं आहे. तसेच फडणवीसांनी त्यांच्या जवळच्या चेलेचपाट्यांना सांभाळावं असा सल्लादेखील उन्मेश पाटील यांनी फडणवीसांना दिला आहे. पाटील म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांच्या चेलेचपाट्यांमुळे खानदेशाचं मोठं नुकसान होत आहे. हे वक्तव्य करत असताना पाटील यांचा रोख मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे होता, असं बोललं जात आहे.
पाटील यांनी गिरीश महाजन यांचा नामोल्लेख टाळत त्यांच्यावर निशाणा साधल्याची चर्चा आहे. तसेच, मला तुरुंगात टाकून जर प्रश्न सुटत असतील तर मी आनंदाने तुरुंगात जायला तयार आहे, असंही पाटील म्हणाले.
News - Unmesh Patil Says Devendra Fadnavis Didnt Give Me Ministry To Do Corruption Like Ajit Pawar