अजित पवारांना भाजपाकडून बळीचा बकरा बनवलं... जितेंद्र आव्हाडांचा आरोप

“भाजपाकडून अजित पवारांचा बळीचा बकरा केला जातो आहे. उत्तर प्रदेशात मोदींना कमी मतं मिळाली याला काय अजित पवार जबाबदार आहेत? याचं उत्तर भाजपाने द्यायला पाहिजे. भाजपाची मतं कमी झाली आहेत. छोट्यातल्या छोट्या गोष्टींवर टीव्हीवर, चॅनल्सवरुन बोलणारे लोक कुठे गेले? हे लोक ऑर्गनायझरवर का बोलत नाहीत? इकडून तिकडे उड्या मारणारे लोक काय बोलणार?” असं म्हणत आव्हाड यांनी भाजपावर टीका केली.

अजित पवार ( संग्रहित छायाचित्र )


द ऑर्गनायझर मध्ये अजित पवारांना टार्गेट करण्यात आलं होतं. भाजपाने अजित पवारांना बरोबर घ्यायला नको होतं या आशयाचा लेख लिहिण्यात आला होता. त्यावर जितेंद्र आव्हाड यांनी हे उत्तर दिलं आहे.

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपाचं पानिपत झालं आहे. मागच्या वेळी २३ जागा जिंकणाऱ्या भाजपाची यावेळची संख्या ९ वर आली आहे. तर महायुतीला फक्त १७ जागा मिळाल्या आहेत. यानंतर आता अजित पवारांना पक्षात का घेतलं? याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. या चर्चा सुरु झाल्या आहेत त्या ऑर्गनायझर या संघाच्या मुखपत्रात आलेल्या लेखामुळे. यानंतर आता जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांना बळीचा बकरा केला जातं आहे असं म्हटलं आहे. भाजपावर त्यांनी आरोप केले आहेत.

थोडे नवीन जरा जुने

संपर्क फॉर्म