"रिटायर्ड बट नॉट टायर्ड" या माहितीपटाची क्रेडेन्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद...

पुणे ( DailyMarathiNews ): "रिटायर्ड बट नॉट टायर्ड" या माहितीपटाचे लेखन व निर्मिती डॉ. तुषार निकाळजे यांनी केली आहे. या माहितीपटाची नोंद क्रेडेन्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झाली आहे. डॉ. निकाळजे यांनी सेवानिवृत्तीनंतरच्या स्वतःच्या जीवनावर आधारित हा माहितीपट तयार केला आहे.

"रिटायर्ड बट नॉट टायर्ड" या माहितीपटाची क्रेडेन्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद


डॉ. निकाळजे यांनी सेवानिवृत्तीनंतर शैक्षणिक व संशोधन कार्यात स्वतःला गुंतवून घेतले. पुस्तक लेखन, लेख लिहिणे, आंतरराष्ट्रीय चर्चासत्र, शोधनिबंध, माहितीपट किंवा डॉक्युमेंटरी निर्मिती इत्यादी शैक्षणिक व संशोधनात्मक कार्यामध्ये ते व्यस्त आहेत. घरगुती व कौटुंबिक जबाबदाऱ्यांबरोबरच सामाजिक, शैक्षणिक व संशोधनात्मक काम करीत आहेत. सेवानिवृत्तीनंतर त्यांना दोन आंतरराष्ट्रीय व एक राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.

डॉ. तुषार निकाळजे


डॉ. निकाळजे यावेळी म्हणाले, "माझा सेवानिवृत्तीनंतरचा प्रवास हा इतरांनाही प्रेरणादायी ठरावा, या हेतूने मी "रिटायर्ड बट नॉट टायर्ड" या माहितीपटाची निर्मिती केली आहे".

सिनेमा ऑटो ग्राफर व एडिटर श्री. शुभम महादेव यांनी केले आहे. प्रोडक्शन मॅनेजर सुपरमॅन सोनवणे आहेत. कॅमेरा अटेंडंट रोहित सुनील कांबळे आहेत.

- DailyMarathiNews

थोडे नवीन जरा जुने

संपर्क फॉर्म