मी १८ वर्षांची असताना एका सेक्रेटरी आणि एका अभिनेत्याने... 'खल्लास गर्ल' ईशा कोप्पीकरचा धक्कादायक खुलासा!

 

'खल्लास गर्ल' ईशा कोप्पीकरने ( Isha Koppikar ) इंडस्ट्रीत काम करताना आलेले वाईट अनुभव एका मुलाखतीत सांगितले आहेत.

Isha Koppikar ( from her Instagram page )


ईशाने सिद्धार्थ कन्ननला मुलाखत दिली. इंडस्ट्रीतील तिच्या सुरुवातीच्या काळात कास्टिंग काउचच्या अनुभवाबद्दल बोलताना ईशा भावुक झाली.

तिला विचारण्यात आलं की आयटम नंबर्सनंतर टाईपकास्ट झाल्यावर तिने निर्मात्यांकडून कधीतरी महत्त्वाच्या भूमिका मागितल्या का? यावर ईशा म्हणाली, “हे कधीच तुम्ही काय करू शकता याबद्दल नव्हतं. हे सगळं हिरो ठरवायचे. तुम्ही #MeToo बद्दल ऐकलं असेलच, जर तुम्ही मुल्यांवर जगत असाल तर तुमच्यासाठी या इंडस्ट्रीत काम करणं खूप अवघड आहे. माझ्या काळात अनेक अभिनेत्रींनी इंडस्ट्री सोडली. एकतर त्या मुलींनी हार मानली किंवा त्यांना जे करण्यास सांगण्यात आलं ते त्यांनी केलं. अशा खूप कमी आहेत ज्या अजूनही इंडस्ट्रीत आहेत आणि त्यांनी हार मानली नाही आणि मी त्यापैकी एक आहे.”


१८ व्या वर्षी ईशाला कास्टिंग काउचचा भयानक अनुभव आला होता. “मी १८ वर्षांची असताना एका सेक्रेटरी आणि एका अभिनेत्याने कास्टिंग काउचसाठीसाठी अप्रोच केलं. त्यांनी मला सांगितलं की काम मिळवण्यासाठी तुम्हाला अभिनेत्यांशी ‘फ्रेंडली’ राहावं लागेल. मी खूप फ्रेंडली आहे, पण ते जे म्हणत होते ते ‘फ्रेंडली’ म्हणजे काय? मी इतकी फ्रेंडली आहे की एकता कपूरने मला एकदा थोडा अॅटिट्यूड ठेवण्याचा सल्ला दिला होता,” असं ईशा म्हणाली.

एका ए-लिस्ट अभिनेत्याने तिला एकटं भेटायला बोलावलं होतं, तो प्रसंग ईशा कोप्पीकरने सांगितला. ईशा म्हणाली, “मी २३ वर्षांची असताना एका अभिनेत्याने मला माझ्या ड्रायव्हरशिवाय किंवा इतर कुणालाही सोबत घेतल्याशिवाय त्याला एकटं भेटायला बोलावलं, त्यावेळी त्याचं नाव बऱ्याच अभिनेत्रींशी जोडलं जात होतं. तो म्हणाला, ‘माझ्याबद्दल आधीच कॉन्ट्रोव्हर्सीज आहेत आणि कर्मचारी अफवा पसरवतात.’ पण मी त्याला नकार दिला आणि त्याला सांगितलं की मी एकटी येऊ शकत नाही. तो हिंदी चित्रपटसृष्टीतील ए-लिस्ट अभिनेता होता.”

अभिनेते आणि दिग्दर्शकांचे सेक्रेटरी तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करायचे, तेही ईशाने सांगितलं. “ते येऊन मला फक्त चुकीच्या पद्धतीने स्पर्शच करायचे नाहीत, तर ते हात पिळून म्हणायचे, ‘तुला अभिनेत्यांशी मैत्री करावी लागेल,” असं ईशा म्हणाली.

Isha Koppikar - from her Instagram profile


अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर ईशा कोप्पीकरने ‘फिझा’ चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं.

ईशा कोप्पीकर ( Isha Koppikar ) शेवटची तामिळ चित्रपट ‘अयलान’मध्ये दिसली होती. ईशा काही महिन्यांपूर्वी वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिली. तिने पती टिमी नारंगपासून घटस्फोट घेतला आहे.

थोडे नवीन जरा जुने

संपर्क फॉर्म