अन्नपदार्थाच्या घरपोच बटवड्याच्या क्षेत्रातील झोमॅटोने पेटीएम कंपनीच्या चित्रपट तिकीट व कार्यक्रम व्यवसाय विकत घेण्याबाबत चर्चा सुरू केली आहे.
नवी दिल्ली ( DailyMarathiNews ): अन्नपदार्थाच्या घरपोच बटवड्याच्या क्षेत्रातील झोमॅटोने पेटीएम कंपनीच्या चित्रपट तिकीट व कार्यक्रम व्यवसाय विकत घेण्याबाबत चर्चा सुरू केली आहे. पेटीएमची पालक कंपनी वन ९७ कम्युनिकेशन्ससोबत झोमॅटोची या सुमारे १,५०० कोटी रुपयांच्या या व्यवहारावर चर्चा सुरू असल्याच्या वृत्ताला उभय कंपन्यांनीही दुजोरा दिला आहे.
झोमॅटोने याबाबत भांडवली बाजाराला नियमानुसार प्रगटन या स्वरूपात दिलेल्या माहितीत, पेटीएमसोबत सध्या या व्यवहारावर चर्चा सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे. तथापि या संबंधाने अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. संचालक मंडळ आणि इतर आवश्यक मंजुरीचे सोपस्कारही पूर्ण करावेत, अशा टप्प्यावर हा व्यवहार अद्याप पोहोचलेला नाही. कंपनी तोट्यातील व्यवसायांमध्ये सुधारणा करीत आहे. झोमॅटोने सध्या चार मुख्य व्यवसायांवर लक्ष केंद्रित केले असल्याचे म्हटले आहे.