सेवानिवृत्तीनंतर आजही शैक्षणिक, संशोधनात्मक, लेख पुस्तक लिखाण, लघु प्रकल्प यामध्ये व्यस्त आहेत. डॉ. निकाळजे यांचा हा प्रवास इतरांनाही प्रेरणादायी ठरणारा आहे.
तसेच युनिव्हर्सिटी टेक्नॉलॉजी मारा, मलेशिया या विद्यापीठाने "एक्सलेंस इन द फील्ड ऑफ एज्युकेशन" या पुरस्कारासाठी डॉ. निकाळजे यांची निवड केली आहे. मलेशिया येथील पुरस्कार सोहळा सप्टेंबर 2024 रोजी संपन्न होणार आहे.
डॉ. निकाळजे यांनी आजपर्यंत 14 पुस्तके लिहून प्रकाशित केली आहेत. दोन पुस्तके महाराष्ट्रातील 9 विद्यापीठांच्या व 4 स्वायत्त महाविद्यालयांच्या अभ्यासक्रमांना संदर्भ पुस्तक म्हणून मान्यता प्राप्त आहेत . दृष्टिहीन व्यक्तींकरिता "अंडरस्टँडिंग द युनिव्हर्सिटी" हे इंग्रजी- ब्रेल पुस्तक लिहून प्रकाशित केले आहे.
सामान्य प्रशासन, विद्यापीठ प्रशासन, निवडणूक प्रशासन, नागरी सेवा या विषयांवर आजपर्यंत डॉ. निकाळजे यांनी 86 लेख लिहून प्रकाशित केले आहेत. सदर लेख साप्ताहिके, मासिके, विद्यापीठ अनुदान आयोग मान्यता प्राप्त रिसर्च जर्नल्स यामध्ये प्रकाशित झाले आहेत. त्याचबरोबर डॉ. निकाळजे यांनी चार माहितीपटांची निर्मिती व लेखन केले आहे या माहितीपटांमध्ये क्लर्क टू वर्ल्ड रेकॉर्ड, रिटायर्ड बट नॉट टायर्ड, बिहाइंड द व्हाईट कॉलर हे माहितीपट, तसेच ओन्ली शी कॅन या ॲनिमेशन माहितीपटाचा समावेश आहे.
डॉ. निकाळजे यांना आजपर्यंत राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय 17 पुरस्कार मिळाले आहेत. दिल्ली, पंजाब, हरियाणा, राजस्थान, तामिळनाडू, लंडन, अमेरिका, थायलंड, मलेशिया इत्यादी ठिकाणच्या शैक्षणिक व संशोधन संस्थांनी डॉ. निकाळजे यांचा पुरस्कार देऊन सन्मान केला आहे. डॉ. तुषार निकाळजे यांनी हे सर्व शैक्षणिक व संशोधनात्मक कार्य स्वखर्चाने केले आहे.
डॉ. निकाळजे 32 वर्षे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शिक्षकेत्तर - कर्मचारी म्हणून कार्यरत होते. ते मार्च- 2022 मध्ये सेवानिवृत्त झाले आहेत. परंतु सेवानिवृत्तीनंतर आजही शैक्षणिक, संशोधनात्मक, लेख पुस्तक लिखाण, लघु प्रकल्प यामध्ये व्यस्त आहेत. डॉ. निकाळजे यांचा हा प्रवास इतरांनाही प्रेरणादायी ठरणारा आहे.
News Published by DailyMarathiNews.