११ हजार उच्चशिक्षित पोलीस भरतीच्या शर्यतीत….

 रायगड पोलीस दलातील ४२२ रिक्त पदांसाठी सध्या भरती प्रक्रिया सुरू आहे. ज्यात अनेक उच्च शिक्षित उमेदवारांनी अर्ज केले आहेत.



अलिबाग : रायगड पोलीस दलातील ४२२ रिक्त पदांसाठी सध्या भरती प्रक्रिया सुरू आहे. पोलीस शिपाई, चालक आणि बँण्ड्समन पदासाठी सुरू असलेल्या भरतीसाठी ३१ हजार ०६३ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. यापैकी तब्बल ११ हजार २३३ उच्च आणि अतिउच्च शिक्षित आहेत. ज्यात सनदी लेखापाल, वकील, इंजिनिअर्स, एमबीए, बी फार्म, एम फार्म, बीटेक, एमटेक, एमएसडब्ल्यू अशा उच्च शिक्षित उमेदवारांचा समावेश आहे.

रायगड पोलीस दलातील ४२२ जागांसाठी भरती प्रक्रीया सध्या सुरू आहे. यात ३९१ पोलीस शिपाई, ९ बॅन्ड्समन पोलीस शिपाई आणि ३१ चालक पोलीस शिपाई पोलीस पदांचा समावेश आहे. राज्यभरातून यासाठी ३१ हजार उमेदवारांनी अर्ज केले आहेत. सध्या या उमेदवारांची शारीरिक चाचणी सुरू आहे. आत्ता पर्यंत जवळपास २५ हजार उमेदवारांची शारीरिक चाचणी पूर्ण झाली असून सहा हजार उमेदवारांची चाचणी अद्याप शिल्लक आहे. यात प्रामुख्याने महिला उमेदवारांचा समावेश आहे.

थोडे नवीन जरा जुने

संपर्क फॉर्म