नववर्षाच्या स्वागतासाठी लोणावळा सज्ज, गैरप्रकार रोखण्यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क

 मद्यपान करून रस्त्यावर धांगडधिंगा घातल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी दिला आहे.



लोणावळा : सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी हजारोच्या संख्येने पर्यटक लोणावळ्यात दाखल होत आहेत. हुल्लडबाज पर्यटकांवर आणि नियमांचं पालन न करणाऱ्या टवाळखोरांवर लोणावळा पोलिसांची करडी नजर असणार आहे. मद्यपान करून रस्त्यावर धांगडधिंगा घातल्यास कडक कारवाई करण्यात येईल. असा इशारा लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी दिला आहे.

पुणे- मुंबई सह इतर शहरांमधून लोणावळ्यात हजारो पर्यटक नूतन वर्षाचे स्वागत करण्यासाठी दाखल होत होतात. यावर्षी देखील ३१ डिसेंबर साजरा करण्यासाठी पर्यटक लोणावळा नगरीत दाखल होत आहेत. काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून लोणावळा शहर, टायगर पॉईंट, लायन्स पॉईंट पवना डॅम वर पोलिसांची करडी नजर असणार आहे. पर्यटकांनी ३१ डिसेंबर आनंदात आणि उत्साहात साजरा करावा. रस्त्यावर कुणीही हुल्लडबाजी करू नये. धांगडधिंगा घालू नये. अन्यथा कडक कारवाई करण्यात येईल. असा इशारा किशोर धुमाळ यांनी दिला आहे.

थोडे नवीन जरा जुने

संपर्क फॉर्म