बीड जिल्ह्यात शांतता ठेवायची असल्यास, वाल्मिक कराड याला कठोर शिक्षा झाली पाहिजे : रामदास आठवले

संतोष देशमुख यांच्या हत्येचा मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड असून त्याच्यावर कडक कलम लावून शिक्षा झाली पाहिजे,अशी मागणी सुरवातीपासून सर्वांची आहे.आता वाल्मिक कराड कोठडीमध्ये असून त्या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे रामदास आठवले यांनी सांगितले.



वाल्मिक कराड यांना 14 दिवसांची पोलीस कोठडी

बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती.या हत्येमागे वाल्मिक कराडचं नाव समोर आल्यानंतर तब्बल 20 दिवस वाल्मिक कराड फरार होते.काल पुण्यातील सीआयडी कार्यालयात हजर झाले आणि काल रात्री उशिरा बीड येथील केज न्यायालयात हजर करण्यात आले.त्यावेळी बराच काळ दोन्ही बाजूने युक्तिवाद झाल्यानंतर सरकारी वकिलांची मागणी मान्य करीत वाल्मिक कराड यांना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.त्यानंतर अनेक राजकीय प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली.त्याच दरम्यान केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे पुणे दौर्‍यावर आले होते. त्यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधी सोबत संवाद साधत अनेक घडामोडी बाबत भाष्य केले.

संशयित आरोपी वाल्मिक कराड हा तब्बल 20 दिवसानंतर स्वतः हून पोलिसांसमोर हजर

बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये मागे वाल्मिक कराड असल्याचा आरोप असून आता पोलिसांनी अटक केली आहे.त्या रामदास आठवले म्हणाले की, बीड येथील संतोष देशमुख यांची क्रूरपणे हत्या करण्यात आली आहे.त्या घटनेच्या पार्श्वभूमीवर संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आहे.माणुसकीला कलंक लावणारी घटना घडलेली आहे.तसेच या प्रकरणातील संशयित आरोपी वाल्मिक कराड हा तब्बल 20 दिवसानंतर स्वतः हून पोलिसांसमोर हजर झालेला आहे. तसेच आतपर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली असून अन्य तीन आरोपींना लवकरात लवकर पोलिसांनी अटक करावी,त्याचबरोबर संतोष देशमुख यांच्या हत्येचा मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड असून त्याच्यावर कडक कलम लावून शिक्षा झाली पाहिजे,अशी मागणी सुरवातीपासून सर्वांची आहे.आता वाल्मिक कराड कोठडीमध्ये असून त्या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

थोडे नवीन जरा जुने

संपर्क फॉर्म